अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड मार्फत सुदर्शन कला, संगीत शिबीरास सुरुवात

        अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड मार्फत सुदर्शन कला व संगीत शिबीर दि. २२ एप्रिल ते दि. ३० एप्रिल २०२५ या कालावधी मध्ये  आयोजित करणेत आले आहे. या शिबिराचा उदघाट्न समारंभ संपन्न झाला. 
       इयत्ता ३ री ते १० वी या वयोगटातील विद्यार्थी - विद्यार्थिंनीसाठी परीक्षा कालावधीनंतर संगीत, कला,  याचे शिक्षण मिळावे सुट्टीच्या वेळेचा सदूपयोग व्हावा म्हणून या उन्हाळी शिबीरामध्ये कॅनव्हास पेंटिंग, पाऊच पेंटिंग, पॉट पेंटिंग, वारली कला, कागदकामातील विविध कला शिवाय संगीतातील तबला, सुरपेटी, गिटार, करा-ओके गायन इ. सुप्त कलागुणांना वाव मिळावा  या करिता या कला शिबिराचे आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रमाचे उद्घाटन 91.2 fm रेडिओ आर. जे. सौ.राजश्री महाजन यांचे हस्ते करणेत आले.
    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संचालिका कांचन उपाध्ये मॅडम यांच्या संकल्पनेतून  या शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. 
       यावेळी सर्व विभाग मुख्याध्यापक, कलाशिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या शिबिरास कलाशिक्षक हेमंत मोहिते, महंमद पाकजादे, शंकर भजनावळे, महेश काकडे, संगीत शिक्षक विक्रम कदम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.  
         कार्यक्रमाची प्रस्तावना सुशांत पाटील, सूत्रसंचालन शिवकन्या जमदाडे, आभार दिलीप माळी यांनी केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी