सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड शाळेमध्ये सायकल वाटप आणि सायकल बँक योजनेचा उद्घाटन सोहळा
आरवाडे फाउंडेशन प्रा. लि. पुणे व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड(सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड या शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला. 100 वर्षासाठी काम करायचे असेल तर आदर्श विद्यार्थी घडवा लागतो या संकल्पनेतून गरीब होतकरू व हुशार मुलींना शाळेला ये–जा करण्यासाठी सायकल बँक योजना सुरू करणेत आली. या योजनेमुळे विद्यार्थिनींचा वेळ आणि कष्ट नक्कीच वाचतील व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत होईल. यासाठी सायकलची गरज ओळखून आरवाडे फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष आरवाडे व नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.अण्णासाहेब उपाध्ये सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिरीष चिरमे सर, पर्यवेक्षक श्री.अनिल चौगुले अकुज् प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया पाटील मॅडम यांचे शुभ हस्ते इयत्ता ५ वी ते ९ वी मधील १५ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी आरवाडे फाउंडेशनचे श्री. विनायक पाटील व श्री. शुभम गवळी, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी व पालक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.रिया पाटील व आभार श्री.अनिल शिंदे सरांनी केले.