ATA फ्रेटलाईन, सार्थक मेमोरियल ट्रस्ट पुणे व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने राजेंद्र हौसिंग सोसायटी येथे वृक्षारोपण संपन्न

आज ATA फ्रेटलाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, सार्थक मेमोरियल ट्रस्ट पुणे व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने राजेंद्र हौसिंग सोसायटी, भारत सूतगिरणी कुपवाड या ठिकाणी सांगली विधानसभेचे आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांचे शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या वृक्षारोपणाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी सार्थक ट्रस्ट चे प्रमुख श्री. सौरभ शहा सर, सी.ए.श्री.कळमकर सर, श्री. मोहन पाटील सर यांचे मोलाचे योगदान लाभले. सार्थक मेमोरियल ट्रस्टने नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या व अकुज ट्रस्ट च्या सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन एक चांगल्या भविष्यकालीन योजनेसाठी हा निधी दिलेला होता या निधीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणेसाठी आज सार्थकी पडत आहे. याकरिता नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा. सुरज उपाध्ये सर, सचिव श्री.रितेश शेठ सर, सौ. कांचन उपाध्ये मॅडम, श्री. अभिजित शेटे सर श्री. मौलाली शेख सर व सर्व सन्माननीय सदस्य, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या वृक्षारोपण संकल्पनेकरिता विशेष परिश्रम घेणारे श्री. दिलीप माळी सर, श्री. निष्कलंक चौगुले सर,श्री. अनिल शिंदे सर, श्री. स्नेहल लाड सर, श्री. मंगलसिंग भिल सर व श्री. राहुल कांबळे यांचे विशेष कौतुक व आभार.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी