अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड मध्ये विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

Admin



कुपवाड : येथील अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली)  संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल कुपवाड शाळेत शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.  इ. 1 ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे इ. नर्सरी, लहानगट व मोठा गटाची विद्यार्थी विविध शास्त्रज्ञांच्या वेशभूषेमध्ये आले होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवनकौशल्य विकास, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरीग मॅथ्स (STEM), नासो, इंडस्ट्रीयल व्हिजिट्स, मॅथ्स, स्कील बेसड् लर्निंग यामध्ये  फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, वर्कशॉप आणि इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी, हॉर्टीकल्चर ॲण्ड ॲग्रीकल्चर, ऊर्जा आणि पर्यावरण या अंतर्गत 85 च्या जवळपास प्रोजेक्ट मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. या प्रोजेक्ट मॉडेल मधून आधुनिक तंत्रज्ञान,  सौरऊर्जेची निर्मिती,  शेती, पर्यावरण  यांचे फायदे याविषयी संदेश दिला.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक आण्णासाहेब उपाध्ये सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. बापू जाधव, अभिजित घाटगे, अभिमान उगाळे, सुहास सुतार, संस्थेचे उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सेक्रेटरी रितेश शेठ सर, संचालक अभिजीत शेटे, प्राचार्या कांचन उपाध्ये, उपप्राचार्या रोझिना फर्नांडिस  हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सरस्वती पुजन व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करणेत आले. 

            प्रा. बापू जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या बालपणीच्या उदाहरणातून वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात नावीन्यपूर्ण साहित्य केले पाहिजे व त्यांचा दैनंदिन जीवनात वापर झाला पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर करू नये, टिकाऊ व विना खर्चिक वस्तूंची निर्मिती करून इतरांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक रांगोळी काढून त्याच्यातून विज्ञान संदेश देण्यात आले. 

            कुपवाड मधील शाळा स्तरावरील हे सर्वात मोठे विज्ञान प्रदर्शन होते. प्रदर्शन पाहणेसाठी परीसरातील शाळेमधील,विद्यार्थी व शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.