नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने 76 वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

Admin
          
          नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली)  संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हाय व उच्च, माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी व प्रि प्रायमरी स्कूल, लाल बहादुर बालमंदीर कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने भारताचा 76 व्या प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसिध्द व्याख्याते, लेखक मा. श्री. भिमराव धुळूबुळू यांचे हस्ते ध्वजारोहन व भारत माता प्रतिमापूजन संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये यांनी प्रास्ताविक करताना संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
          यावेळी अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल व  सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूलच्या RSP व MCC च्या विद्यार्थ्यांनी  संचलन सादर केले व मानवंदना दिली. सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम व भाषणे  त्यामध्ये अकुज् इंग्लिश स्कूल देशभक्तीपर नृत्य,  भारतीय संस्कृती दर्शन अकुज् प्रायमरी स्कूल विद्यार्थ्यांनी एकपात्रीनाटक, उपाध्ये गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नृत्य,  न्यू प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी राजवीर पाटोळे भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित र्किर्तन प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शाळेमध्ये रांगोळी व चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच विविध स्पर्धापरीक्षा व क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी – विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
 प्रमुख पाहूणे प्रा.भिमराव धुळूबुळू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून,संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
           यावर्षीची खास बाब म्हणजे अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल व उपाध्ये गर्ल्स हायस्कूल या दोन्ही विभागाचे दोन प्लाटून पोलिस मुख्यालयाच्या पोलिस परेड ग्रांऊडला संचलनामध्ये सहभागी झाले होते.
          या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सेक्रेटरी रितेश शेठ, संचालिका कांचन उपाध्ये, डॉ. पूनम उपाध्ये, संचालक बादल उपाध्ये,  बाळासाहेब कोथळे, सेवानिवृत्त मेजर विद्याधर उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक व विभागप्रमुख आदीसह सर्व विभागांतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी  मानले.