पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड मध्ये चित्रकला व रांगोळी प्रदर्शन

इमेज
                     नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्यामार्फत रिफ्रेश योर माईंड या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींच्या शारीरिक, भावनिक, मानसिक व वैचारिक क्षमतांना प्रब्लता निर्माण करण्यासाठी व आत्मविश्वास वाढवून बळ देण्यासाठी रिफ्रेश योर माईंड या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे मनोबल वाढविले जात आहे.            संस्थेचे सचिव मा.रितेश शेठ सर यांच्या कल्पनेतून इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींना दर शनिवारी स.11.30 ते 12.30 या वेळेत मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थिनींमध्ये सक्षम आव्हानांना सामोरं जाणारे व्यक्तिमत्व घडवत आहोत म्हणूनच 26 जानेवारी 2025 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रिफ्रेश युवर माईंड  या विषयावर रांगोळी, चित्रकला व पोस्टर प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात आल्या.           कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक व व्याख्याते मा.भिमराव धुळूबुळू व संस्थेचे संस्था...

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने 76 वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

इमेज
                     नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली)  संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हाय व उच्च, माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी व प्रि प्रायमरी स्कूल, लाल बहादुर बालमंदीर कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने भारताचा 76 व्या प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसिध्द व्याख्याते, लेखक मा. श्री. भिमराव धुळूबुळू यांचे हस्ते ध्वजारोहन व भारत माता प्रतिमापूजन संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये यांनी प्रास्ताविक करताना संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.           यावेळी अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल व  सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूलच्या RSP व MCC च्या विद्यार्थ्यांनी  संचलन सादर केले व मानवंदना दिली. सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम व भाषणे  ...

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी

इमेज
              बालेवाडी पुणे येथे इंडियन आर्मी डे निमित्त मार्शल कॅडेट फोर्स, महाराष्ट्र  यांच्यामार्फत 77 व्या इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड (सांगली) संचलित, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. या इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 71 शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण 300 गुणांची विभागणी होती त्यापैकी 272.34 गुण मिळवून अकुज इंग्लिश मिडीयम स्कूलने अव्वल स्थान पटकावून शाळेचे नावलौकिक वाढविले.          या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक प्रशांत आढळी सर, परशुराम नंदिवाले सर, अभय चौगुले सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा. श्री सुरज उपाध्ये सर, सचिव मा. रितेश शेठ सर, संस्थेच्या संचालिका व प्रशालेच्या प्राचार्या सौ.कांचन उपाध्ये यांची प्रेरणा लाभली. विद्यार्थी व प्रशिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

इमेज
                    नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,कुपवाड, एटीए  फ्रेटालाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे व सार्थक मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अकुज शैक्षणिक संकुल, कुपवाड, अकुज् ड्रिमलॅण्ड, कुपवाड व एम. आय. डी. सी. कुपवाड परिसरामध्ये आज गुरुवार,  दि. 9 जानेवारी 2025  रोजी भव्य वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वछंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली.  स्वागत व प्रास्ताविक सौ.आ.आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एम. माळी सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  श्री मोहन पाटील सर (प्रोग्राम ॲडव्हायझर पर्यावरण प्रकल्प सल्लागार), श्री मनोज कलमकर सर (सी.ए) (एटीए कंपनी), श्री सौरभ शहा सर (ट्रस्टी एस.एम.टी), सौ स्वाती करंदीकर (अध्यक्ष, हिरवळ फाउंडेशन), श्री. राकेश दडनावर (अध्यक्ष, निर्धार फाउंडेशन्) तसेच संस्...