कुपवाड मधील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचा 53 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त क्रीडा महोत्सव व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी दिली त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड, सांगली ची स्थापना दि. १७ डिसेंबर १९७१ रोजी झाली आज नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेस ५२ वर्ष पूर्ण होवून ५३ व्या वर्षामध्ये संस्थेचे पदार्पण होत आहे. सन १९७१ लालबहादूर बालमंदीर या नावाने कुपवाड मध्ये प्रथम बालवाडीची सुरुवात झाली. यानंतर १९८४ साली माध्यमिक, १९८५ मध्ये प्राथमिक आणि २००५ मध्ये उच्च माध्यमिक असा संस्थेचा विस्तार होत गेला. आज वेगवेगळ्या विभागात सर्व मिळून जवळपास २५०० विद्यार्थी
विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
शासनाचे धोरण व झपाट्याने होणारे बदल लक्षात घेवून संस्थेनीही या आय. टी. इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी मध्ये भारताने केलेली क्रांती पाहून
काळाबरोबर आपणही बदल केला पाहिजे. त्याप्रमाणे मूल्यवर्धनाचे शिक्षण देणारी म्हणजे
विद्यार्थ्यांमधील वागणे बोलणे हे वैचारिक होवून समाजामध्ये एक आदर्श नागरिक कसा असावा याचे धडे व शिक्षण डॉ. अजित पाटील, डॉ. पूनम उपाध्ये, सौ. सपना लडडा मॅडम , व श्री. प्रशांत बेळकी हे प्रामुख्याने करणारी टीम आहे. विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्राधान्य देवून विद्याची
आनंदी व शरीर प्रकृतीने निरोगी व उत्साही रहावा म्हणून पुण्याहून प्रत्येक शनिवारी एम. सी. एफ ग्रुपमधील १२ एक्स मिलीटरी टीम घेवून सर्व
विद्यार्थ्यांना दिवसभर आर्चरी, नेमबाजी, गोळाफेक, मल्लखांब, रोप पक्लायविंग, कराटे, ज्युडो, बॉक्सिंग, अशी ब-याच खेळाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी मनगटाने मजबूत
होतो.
हरियाना व कोटा येथील काही शिक्षक व आपले एक्सपर्ट शिक्षक यांची टीम स्पर्धा परीक्षा
तयारी शिष्यवृत्ती परीक्षा, ड्राईंगच्या ग्रेड परीक्षा, एन.एम.एम.एस., जेईई - नीट, यू.पी एस.सी,
एम.पी.एस.सी फौंडेशन कोर्सची तयारी या संस्थेकडून करुन घेतली जाते.
१७ डिसेंबर संस्था वर्धापनदिनानिमित्त
श्री सत्यनारायण महापूजा, पालक महिला हळदीकुंकु कार्यक्रम तसेच व्याख्यान, बक्षीस समारंभ आयोजित करणेत आले आहे. शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे शाळा स्तरावर नियोजन करणेत आलेले असून आंतरशालेय स्पर्धा दिनांक
१८ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत करणेत आलेले असून या सर्वांचा समारोप दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.