अकुज स्कूलमध्ये मुल्यवर्धन शिक्षणाचा विद्यार्थ्याना लाभ

Admin

       


      भारतीय जैन संघटना व शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्यामार्फत सुरू असलेला मूल्यवर्धन शिक्षण अभ्यासक्रम  अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) संचलित अकुज इंग्लिश मिडियम स्कूल व अकुज प्रायमरी स्कूल व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सौ. आ. आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड व न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड या शाळांच्या इ. 1 ली ते 8 वी  इयत्तेच्या वर्गांमध्ये राबवला जातो. आज अखेर शाळेतील जवळपास 4700 विद्यार्थी – विद्यार्थींनींना या मुल्यवर्धन शिक्षणाचा फायदा झाला आहे.

           मुल्यवर्धन शिक्षण सुरू करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना मानस शास्त्रीय शिक्षण पध्दतीतून अभ्यास कसा करावा?  शैक्षणिक व व्यवहारीक गोष्टी सोप्यापध्दतीने जीवनात कशा प्रकारे अंमलात आणावेत  याचे योग्य प्रकारे शिक्षण दिले जाते.

            मूल्यवर्धन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये बरेच  बदल दिसून आले त्यामध्ये विद्यार्थ्यांची स्वतःविषयीची जाणीव अधिक समृद्ध झाली. ते स्वतंत्रपणे विचार करु लागले, जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली. तसेच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास सक्षम झाले आहेत. विद्यार्थी समाजातील विविधता ओळखू लागले आणि त्यांचा आदर करू लागले आहेत विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य सुधारण्यास मदत झाली. शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थी यांचे संबंध दृढ झाले आहेत

              शिक्षण हक्क कायद्यामधील बालस्नेही, विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाविषयीच्या अनेक अपेक्षा पूर्ण होण्याकडे शाळेची वाटचाल सुकरपणे झाली. विद्यार्थी कुटुंबातील, शाळेतील व परिसरातील व्यक्तींच्या मदतीसाठी व कल्याणासाठी योगदान देऊ लागले.  किशोरवयीन मुला- मुलींना नैराश्याशी सामना कसा करावा? याचे शिक्षण दिले जाते.  मुलांना  विविध उदाहरणाव्दारे खेळीमेळी वातावरणामध्ये शिक्षण दिले जाते. ताणतणाव कमी करणेसाठी मेडिटेशन करणेत येते. 

           हा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना व शांतिलाल मुथा फांऊडेशन, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येतो. अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संस्थेमार्फत डॉ. पूनम उपाध्ये,डॉ. अजित पाटील, सपना लढ्ढ़ा, प्रशांत बेळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, संस्थेच्या संचालिका व अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये यांचे  विशेष मार्गदर्शन लाभले.