नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाडचा 53 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला. वर्धापनदिनी कार्यक्रमास प्रमुख पाहूणे श्री. एन.डी. बिरनाळे, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, संचालक बाळासो कोथळे संचालिका आशालता उपाध्ये, कांचन उपाध्ये, डॉ. पूनम उपाध्ये, एस. ए. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनासह संस्था ध्वजारोहनाने करण्यात आली. उपस्थित पालकांच्या हस्ते सत्यनारायण पुजा करणेत आली. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व स्वच्छंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ईशस्तवन गीत सादर केले. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये यांनी आजपर्यंतचा संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला तसेच उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहूण्यांनी संस्थेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देवून, संस्थेच्या उपस्थित विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम त्यामध्ये जिओग्राफी लॅब, कॉम्पुटर लॅब, लँग्वेज लॅब, सायन्स लॅब, गणित लॅब, म्युझिक लॅब यास भेट दिली तसेच संस्थेमध्ये सुरू असलेल्या एम. सी. एफ आर्मी प्रशिक्षण व जीवन कौशल्य व मुल्यवर्धन शिक्षण याबद्दल माहिती घेतली व संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा, क्रीडा परीक्षा, शालेय परीक्षेच्या उत्तुंग यशाबद्दल सत्कार व बक्षिस वितरण प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करणेत आले.
कार्यक्रमास आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सुत्रसंचालन सुनिता चौगुले, आभार सुप्रिया पाटील यांनी मानले.