"अकुज् खेलरंग 2024" आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा कुपवाडमध्ये शानदार प्रारंभ

Admin

   नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संयुक्त सर्व विभागांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा  "अकुज् खेलरंग - 2024" उद्घाटन दि.18  डिसेंबर 2024 रोजी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.मा.श्री.विश्वजीत गाढवे साहेब, प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मा.अरविंद गावंडे सर तसेच नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर यांचे शुभहस्ते ध्वजारोहन व सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पाहुण्यांचे सत्कार, खेळाडूंचे स्वागत, क्रीडा ज्योत, क्रीडा शपथ, फूड स्टॉल, MCF प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मानवंदना, मलखांब, रिंग डान्स प्रात्यक्षिके, इ. उपक्रमांनी  सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, संचालिका कांचन उपाध्ये ,सर्व विभागांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सुत्रसंचालन रिया पाटील, प्रतिभा आठवले आभार क्रीडा शिक्षक श्री.एस.एम. कांबळे सर यांनी मानले.