पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोझिना फर्नांडिस यांना रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांचा आदर्श शिक्षिका नेशन बिल्डर ॲवार्ड - 2024

इमेज
          शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंचा सन्मान रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांचे मार्फत  करणेत आला एक आदर्श शिक्षिका कशी आसावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोझिना फर्नांडिस. त्या मागील 33 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत विविध शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका व शिक्षिका म्हणून काम पाहिले.            सद्या त्या कुपवाड येथील अकुज् इंग्लिश मिडियम स्कूलच्या उपमुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शाळेमध्ये त्यांनी डिजीट्ल शिक्षण प्रणाली, जीवन कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, इंडस्ट्रीयल भेटी, स्कॉलरशिप, नासो व ऑलिम्पियाड परीक्षा, शिक्षक प्रशिक्ष्ण हे शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रम राबवून विद्यार्थी व शिक्षक यांच्या सर्वागिंण विकासासाठी त्या प्रयत्नशील आहेत.            या सर्व कार्याची दखल घेवून त्यांना रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांचे मार्फत आदर्श शिक्षिका नेशन बिल्डर ॲवार्ड – 2024  पुरस्काराने सन्मानित करणेत आले. यावेळी  प...

अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड मार्फत मानसशास्त्र समज – गैरसमज याविषयी पालकांची कार्यशाळा संपन्न

इमेज
                      अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड(सांगली) संचलित, अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड  शाळेमार्फत मानसशास्त्र समज – गैरसमज याविषयी पालकांची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  डॉ. अजित पाटील सर,  मानसशास्त्र तज्ञ व सायकॉलॉजिस्ट असोसिएशन, सचिव सदस्य  उपस्थित होते. त्यांनी  "लोकप्रिय मानसशास्त्र आणि खऱ्या मानसशास्त्रातील फरक: वास्तव आणि गैरसमज" आजच्या डिजिटल युगात, मानसशास्त्राविषयी अनेक गैरसमज पसरलेले आहेत. सोशल मीडिया आणि विविध लोकप्रिय माध्यमांमुळे अनेकांना मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असली तरीही, याच माध्यमांमुळे पॉप सायकॉलॉजी किंवा "लोकप्रिय मानसशास्त्र" या संकल्पनेचा उदय झाला आहे. परंतु, पॉप सायकॉलॉजी म्हणजे खरे मानसशास्त्र नव्हे.             लोकप्रिय मानसशास्त्र म्हणजे काय? लोकप्रिय मानसशास्त्र हे सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय असलेले, साधं केलेलं मानसशास्त्र आहे. यात तज्ञांची सखोल समज नसतानाही मानसशा...

अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव

इमेज
             सोलापूर येथे पार पडलेल्या सोहळ्यात अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड सांगली संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल कुपवाड ता. मिरज जि. सांगली या शाळेच्या कार्याची दखल घेवून स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव करणेत आला.  कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा. सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र माने,  मा. सचिन जगताप शिक्षणाधिकारी (माध्य.), मा. कादरजी शेख शिक्षणाधिकारी (प्राथ.), सोलापुर  यांच्या हस्ते अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेस राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करणेत आला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नाडिंस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष (अण्णा) काळजे, संयोजक बापूसाहेब अडसूळ , प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी व्हनकडे, अनिलकुमार धायगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या शाळेच्या यशामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, संचालक अभिजित शेटे, शाळेच्या मुख्याध्य...