सौ. कांचन उपाध्ये यांचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने नाशिक येथे सन्मान




    
   संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत देण्यात येणारा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. कांचन सुरज उपाध्ये मॅडम यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव 2024 पुरस्काराने बिजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहिबाई पोपेरे, खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे सन्मानित करणेत आले.
       सौ. कांचन उपाध्ये या नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) च्या कार्यकारी संचालिका म्हणून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षापासून त्या अकुज इंग्लिश मिडियम स्कूल, कुपवाडच्या प्राचार्या म्हणून काम पाहतात. त्यांनी मागील 15 वर्षात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी