अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) मार्फत सीमेवरील जवानांना रक्षाबंधनानिमित्त राख्यांची भेट

Admin
       
         अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली)या संस्थेच्या अकुज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड व सौ. आशालता अण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड च्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना  स्वतः तयार करून राख्या पाठविल्या. 
         सीमेवरील जवानांसाठी 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम राबविला. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभिमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी चार दिवसांपासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.  
        विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्रे एम.सी. एफ. पुणे यांच्यामार्फत सीमेवरील जवानांना पाठविण्यात आले आहेत. सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सण-उत्सव होतात याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल, असे संस्थेचे उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सर म्हणाले.
       सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला. विद्यार्थिनींनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना झाली असे मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये यांनी सांगितले.  
        यावेळी एम.सी.एफ.पुणे प्रशिक्षक मयूर कुटे, सौरभ जाधव, औदुंबर मौलाने, प्रतीक मोरे, जस्मिन कादरी, निधी गावडे, माधुरी सोनवले, सिद्धेश मासये यांच्याकडे राख्या देणेत आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे, कुंदन जमदाडे, ज्योती पाटील, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस, पर्यवेक्षक अनिल चौगुले, अनिल शिंदे उपस्थित होते.  या उपक्रमासाठी कलाशिक्षक हेमंत मोहिते, शंकर भजनावळे, महेश काकडे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.