रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी समूहगान स्पर्धेत उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे सुयश

Admin
     आज दि.१५ ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी यांच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड, संचलित सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड च्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले.
        सहभागी  विद्यार्थिनींची नावे श्रीशा अडसूळ, श्रावणी सुतार, श्वेता माने,कोमल कलगुडगी, संस्कृती शिंदे, श्रावणी पाटील, सृष्टी सावंत व गौरी मोरे. इ. हार्मोनियम साथ श्री विक्रम कदम, तबलासाथ श्री. आत्मेश भांडवले, क्लप बॉक्स शैलेश सातपुते, ड्रम साथ श्री.सुशांत पाटील सर यांनी दिली तर स्वच्छंद संगीत विद्यालयाच्या वतीने या गाण्याला संगीत शिक्षक म्हणून श्री.विक्रम कदम सरांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत 14 संघानी आपला सहभाग नोंदवला. 
         या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर, सचिव श्री.रितेश शेठ सर, संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम त्याच बरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरीष चिरमे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.