नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांचे संयुक्त विद्यमाने 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

Admin



कुपवाड (दि. 15/08/2024) :- 

          नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संस्थेच्या  सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हाय व उच्च, माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी स्कूल, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, लाल बहादुर बालमंदीर कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने भारताचा 77 वा  स्वातंत्र्यदिन प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुभाष पाटील यांचे हस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तद्नंतर संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी संचलन, मानवंदना, मार्च पास, रायफल डेमो, देशभक्तीपर गीते, ढोलताशे पथक, विद्यार्थी मनोगते, लाठी काठी, मलखांब, थांग ता, या प्रात्यक्षिकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

        या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून व श्री. सर्वेश कोचेटा, डायरेक्टर राजधानी फॅब्रिक्स, श्री. प्रशांत पाटील वित्त व लेखा परिक्षण व प्रा. कृष्णा आलदर, संस्थापक, ए. पी. जे अब्दुल कलाम फांऊडेशन हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती, इ. 10 वी व 12 वी, TSE, NMMS व इतर स्पर्धापरीक्षेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करणेत आला. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी  संस्थेने नाविन्याने निर्माण केलेल्या ॲस्ट्रोनॉमी ॲण्ड स्पेस लॅब (जिओग्रॉफी लॅब), मिनी सायन्स सेंटर, ॲक्टिव्हीटी लॅब तसेच एम. सी. एफ प्रशिक्षणास भेट दिली व या शाळेमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक सुविधा बद्दल शिक्षकांकडून व विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली, चर्चा केली व समाधान व्यक्त केले. 

         तसेच शशिकला पाटील यांच्याकडून कुबेर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षीप्रमाणे इंग्रजी विषयांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या इ. 7 वी ते 12 वी मधील विद्यार्थी व विद्यार्थींना शिष्यवृत्ती देणेत आली. शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पाटील यांची महाराष्ट्र शासन नगरपरिषद संचालनालय, वित्त व लेखा परिक्षण पदी तसेच अक्षरा खोत यांची ONGC मध्ये इंजिनीअर पदी निवड झालेबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.

          यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सेक्रेटरी रितेश शेठ, संचालिका कांचन उपाध्ये, डॉ. पूनम उपाध्ये, कोमल उपाध्ये संचालक अभिजित शेटे, बादल उपाध्ये, बाळासाहेब कोथळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, राहूल पाटील, महावीर बिरनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.         

           कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक व विभागप्रमुख शिरीष चिरमे, कुदंन जमदाडे, रोझिना फ़र्नांडीस, ज्योती पाटील, पर्यवेक्षक अनिल चौगुले, अनिल शिंदे,  क्रीडा शिक्षक सिध्दार्थ कांबळे, प्रशांत आढळी, परशुराम नंदिवाले, एम. सी. एफ टिमचे प्रशिक्षक सौरभ जाधव व सिध्देश मासये आदीसह सर्व विभागांतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता चौगुले व कुंदन जमदाडे यांनी तर आभार सुशांत पाटील  यांनी मानले.