पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडच्या विद्यार्थ्यांची कुपवाड पोलिस ठाण्यास भेट व पोलिसांसोबत संवाद

इमेज
            अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड येथील विद्यार्थ्यांनी कायदेविषयक ज्ञानाची सखोल माहिती घेण्यासाठी कुपवाड पोलिस ठाण्यास भेट दिली. पोलिसांसोबत संवाद साधला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह अंमलदारांशी संवाद साधत कायदेविषयक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील ठाणे अंमलदार, बारनिशी, गुन्हे, बिनतारी संदेश, कोठडी, मुद्देमाल, दफ्तरी व हजेरी या सर्व कक्षांच्या कार्याची सविस्तररित्या माहिती घेतली. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती पोलिसांनी निःसंकोचपणे दिली. प्रभारी अधिकारी कक्षात पोलिसांशी विद्यार्थ्यांच्या सवाल-जवाबाची चर्चा चांगलीच रंगली. भांडवलकरांसह संजय पाटील, प्रदीप भोसले, चांदणी दाभाडे यांनी मार्गदर्शन केले.       भांडवलकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती व शारीरिक आरोग्यावर भर द्यावा. पालकांसह शिक्षकांचा सन्मान राखत ध्येय गाठावे. पोलिस समाजाच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळेच समाजात आढळणाऱ्या चुकीच्या घटना, उद्भवणाऱ्या समस्या व त्रास निर्धास्तपणे पोलिसांना सांगण्यास पुढाकार घ्यावा. त्यासोबतच...

सौ. कांचन उपाध्ये यांचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने नाशिक येथे सन्मान

इमेज
        संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत देण्यात येणारा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. कांचन सुरज उपाध्ये मॅडम यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव 2024 पुरस्काराने बिजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहिबाई पोपेरे, खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे सन्मानित करणेत आले.        सौ. कांचन उपाध्ये या नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) च्या कार्यकारी संचालिका म्हणून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षापासून त्या अकुज इंग्लिश मिडियम स्कूल, कुपवाडच्या प्राचार्या म्हणून काम पाहतात. त्यांनी मागील 15 वर्षात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) मार्फत सीमेवरील जवानांना रक्षाबंधनानिमित्त राख्यांची भेट

इमेज
                 अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली)या संस्थेच्या अकुज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड व सौ. आशालता अण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड च्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना  स्वतः तयार करून राख्या पाठविल्या.           सीमेवरील जवानांसाठी 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम राबविला. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभिमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी चार दिवसांपासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.           विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्रे एम.सी. एफ. पुणे यांच्यामार्फत सीमेवरील जवानांना पाठविण्यात आले आहेत. सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सण-उ...

रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी समूहगान स्पर्धेत उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे सुयश

इमेज
     आज दि.१५ ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी यांच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड, संचलित सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड च्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले.         सहभागी  विद्यार्थिनींची नावे श्रीशा अडसूळ, श्रावणी सुतार, श्वेता माने,कोमल कलगुडगी, संस्कृती शिंदे, श्रावणी पाटील, सृष्टी सावंत व गौरी मोरे. इ. हार्मोनियम साथ श्री विक्रम कदम, तबलासाथ श्री. आत्मेश भांडवले, क्लप बॉक्स शैलेश सातपुते, ड्रम साथ श्री.सुशांत पाटील सर यांनी दिली तर स्वच्छंद संगीत विद्यालयाच्या वतीने या गाण्याला संगीत शिक्षक म्हणून श्री.विक्रम कदम सरांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत 14 संघानी आपला सहभाग नोंदवला.           या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर, सचिव श्री.रितेश शेठ सर, संचालिका ...