जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ८वी ते १२वी मधील विद्यार्थिनींना कायदेविषयक शिबिर आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ग.गि.कांबळे साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यक्षा महिला बालविकास अधिकारी मा. श्रीमती. निवेदिता ढाकणे, मा.श्रीमती मुक्ता दुबे - पॅनेल विधीज्ञ सांगली, मा. रेखा जाधव- महिला पोलीस उपनिरीक्षक सांगली. तसेच प्रमुख उपस्थिती सेक्रटरी मा.रितेश शेठ, संचालक मा.बादल उपाध्ये नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, शाळेचे मुख्याध्यापक श्री.चिरमे एस,जी. पर्यवेक्षक श्री.ए. एम. चौगुले सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर, विध्यार्थिनी यांचे उपस्थितीत कार्यक्रमाचे स्वागत/प्रस्तावना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस. जी चिरमे सर यांनी पाहुण्यांची ओळख व शिबिराचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गि .ग .कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली. तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली यांनी हसत खेळत विधार्थिनींच्या सहभागातुन good touch आणि bad touch या विषयी प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन कले.
विशेष
मार्गदर्शन श्रीमती निवेदिता ढाकणे अध्यक्षा महिला बालविकास अधिकारी सांगली. भारताचा
2015 चा कायदा बाल न्याय व बालकांचे संरक्षण कायदा (care and protection of
children) या विषयी मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती मुक्ता दुबे पॅनेल विधीज्ञ सांगली
यांनी शिक्षणाचा हक्क (right to education)
याविषयीं मार्गदर्शन केले श्रीमती रेखा जाधव महिला पोलीस उपनिरीक्षक, सांगली
यांनी posco act. म्हणजे काय? मुलींनी स्वतःचे रक्षण व स्वंरक्षण कसे करावे.त्याबद्दल
घ्यावयाची कालजी याविषयीं मार्गदर्शन केले. आभार विजय कोगनोळे सामाजिक कार्यकर्ते यांनी व सूत्रसंचलन
सौ. एस. ए. चौगले यांनी केले.