उपाध्ये गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताहाचा जागर कार्यक्रम संपन्न

Admin
      राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे. 
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सौ.आ.आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्य.विद्यालय, कुपवाड या प्रशालेत २२ जुलै रोजी अध्ययन - अध्यापन दिवस सर्व वर्गात साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी सौ. शेंडगे मॅडम यांनी भेट दिली. दुसरा दिवस २३ जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, तिसरा दिवस २४ जुलै हा विविध खेळांचे प्रात्यक्षिके घेऊन क्रीडा दिवस, गुरुवार, दि.२५ जुलै २०२४ रोजी या सप्ताहातील चौथा दिवस हा आपल्या प्रशालेत सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
      या कार्यक्रमाची प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख सौ. सुनिता चौगुले यांनी केली. सरस्वती पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरीष चिरमे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतील मुख्याध्यापक व पर्यवेक्षक,सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. स्वच्छंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
         शिक्षण सप्ताहाच्या सांस्कृतिक दिवसांतर्गत महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता जपणारी लोककला, सण व उत्सव यांची मांदियाळी विद्यार्थिनींनी आपल्या नृत्य ,नाट्य व वेशभूषेतून सादर केली. 
         याप्रसंगी या कार्यक्रमास सर्व विद्यार्थिनी व शिक्षक सहभागी होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाअंतर्गत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री. सुरज उपाध्ये सर, सचिव श्री. रितेश शेठ सर, संचालिका सौ.कांचन मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिता चौगुले मॅडम यांनी केले.