एम. सी. एफ. प्रशिक्षण अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सुरू

Admin

 




https://youtu.be/v5bxmtXJT0U?si=uUtgCf48pQrnQzP7

https://youtu.be/v5bxmtXJT0U?si=Qk5rk4NtucIV_Pzq

अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) एम. सी. एफ. पुणे महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने फिजिकल ट्रेनिंग, ड्रिल, वैयक्तिक निटनेटकेपणा स्वच्छता, मार्शल आर्ट्स, योगा, ॲडव्हेन्चर कॅम्प, सामाजिक जागरुकता, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, भारतीय संरक्षण दल माहिती, लाठी काठी, मलखांब, रोप मलखांब, कराटे, मॅप रिडींग, सरंक्षण दल शस्त्रे माहिती, आर्चरी इत्यादीची माहिती प्रशिक्षण सुरू झाले असून दर शनिवारी सकाळी 8 ते सांयकाळी 4 वाजेपर्यत हे प्रशिक्षण अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल क्रींडागण, अकुज् ड्रिमलॅण्ड कुपवाड येथे सुरू आहे.

विद्यार्थ्यांचे मन आणि मनगट बळकट करून एक चांगला निरोगी, सदृढ विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन वर्षभर करणेत आलेले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन उपाध्ये यांनी केले.