पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपाध्ये गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताहाचा जागर कार्यक्रम संपन्न

इमेज
      राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे.  नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सौ.आ.आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्य.विद्यालय, कुपवाड या प्रशालेत २२ जुलै रोजी अध्ययन - अध्यापन दिवस सर्व वर्गात साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी सौ. शेंडगे मॅडम यांनी भेट दिली. दुसरा दिवस २३ जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, तिसरा दिवस २४ जुलै हा विविध खेळांचे प्रात्यक्षिके घेऊन क्रीडा दिवस, गुरुवार, दि.२५ जुलै २०२४ रोजी या सप्ताहातील चौथा दिवस हा आपल्या प्रशालेत सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.       या कार्यक्रमाची प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख सौ. सुनिता चौगुले यांनी केली. सरस्वती पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरीष चिरमे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतील मुख्याध्यापक व पर्यवेक्षक,सर्व शिक्षक-शि...

अकुज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वछंद संगीत सभागृहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

इमेज
      नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत व प्रशस्त नवीन संगीत सभागृहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सतारवादक श्री. शाफत नदाफ  व सुप्रसिद्ध तबलावादक श्री.सुमित जमदाडे उपस्थित होते.        कार्यक्रमाची प्रस्तावना अकुज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उपमुख्याध्यापिका  रोझिना फर्नांडिस मॅडम यांनी केली. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते संगीत  सभागृहाचे उद्घाटन, प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व संगीत वाद्यांचे पूजन करण्यात आले. अकुज इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले.      याप्रसंगी बोलताना न्यू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे सर यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर उपस्थित पालकांनीही आपल्या मनोगतातून या नवीन उपक्रमाला सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्यासा...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींकरीता कायदेविषयक शिबिराचे आयोजन

इमेज
  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड   यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ८वी ते १२वी मधील विद्यार्थिनींना कायदेविषयक शिबिर आयोजन   करण्यात आले.   कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ग.गि.कांबळे साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यक्षा महिला बालविकास अधिकारी मा. श्रीमती. निवेदिता ढाकणे, मा.श्रीमती मुक्ता दुबे - पॅनेल विधीज्ञ सांगली, मा. रेखा जाधव- महिला पोलीस उपनिरीक्षक सांगली. तसेच प्रमुख उपस्थिती सेक्रटरी मा.रितेश शेठ, संचालक मा.बादल उपाध्ये नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, शाळेचे मुख्याध्यापक श्री.चिरमे एस,जी. पर्यवेक्षक श्री.ए. एम. चौगुले सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर, विध्यार्थिनी यांचे उपस्थितीत कार्यक्रमाचे स्वागत/प्रस्तावना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस. जी चिरमे   सर यांनी पाहुण्यांची ओळख व शिबिराचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गि .ग .कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली. तथा दिवाणी न्यायाधीश ...

एम. सी. एफ. प्रशिक्षण अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सुरू

इमेज
  https://youtu.be/v5bxmtXJT0U?si=uUtgCf48pQrnQzP7 https://youtu.be/v5bxmtXJT0U?si=Qk5rk4NtucIV_Pzq अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट , कुपवाड ( सांगली ) व एम . सी . एफ . पुणे महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने फिजिकल ट्रेनिंग , ड्रिल , वैयक्तिक निटनेटकेपणा व स्वच्छता , मार्शल आर्ट्स , योगा , ॲडव्हेन्चर कॅम्प , सामाजिक जागरुकता , आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण , भारतीय संरक्षण दल माहिती , लाठी काठी , मलखांब , रोप मलखांब , कराटे , मॅप रिडींग , सरंक्षण दल शस्त्रे व माहिती , आर्चरी इत्यादीची माहिती व प्रशिक्षण सुरू झाले असून दर शनिवारी सकाळी 8 ते सांयकाळी 4 वाजेपर्यत हे प्रशिक्षण अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल क्रींडागण, अकुज् ड्रिमलॅण्ड कुपवाड येथे सुरू आहे. विद्यार्थ्यांचे मन आणि मनगट बळकट करून एक चांगला निरोगी, सदृढ विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन वर्षभर करणेत आलेले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन उपाध्ये यांनी केले.

न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

इमेज
                  नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड (सांगली) संचलित, न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड या शाळेच्या सोहम सुनील कोष्टी - गुण- 242 जिल्हा 29 वा,   मंथन दादासाहेब ठोंबरे -गुण -234  जिल्हा- 44 वा,  रितेश राजेंद्र पुजारी - गुण - 214  याविद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.  "कष्ट करणाऱ्यांच्या एकजुटीला अशक्यप्राय असं काहीच नाही."              सदर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री. अमोल राठोड सर ,सौ. हेमलता धोतरे मॅडम, सौ. आसावरी आरते मॅडम यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर, शाळेचे पर्यवेक्षक श्री .अनिल शिंदे सर, संस्थेचे अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा .सूरज उपाध्ये सर,सेक्रेटरी मा. रितेश सर, संचालिका सौ. कांचन उपाध्ये मॅडम, डॉ.पूनम उपाध्ये मॅडम यांनी सदर विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कुपवाड व परिसरातून कौतूक होत आहे.