पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

इमेज
                  आज शुक्रवार, दि.२१ जुन २०२४ अकुज् शैक्षणिक संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व संगीत दिन उत्साहात साजरा झाला. अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सर्व विभागांचा संयुक्त संगीत, योगदिन संस्थेच्या अकुज् क्रीडांगणावर संस्थेचे अध्यक्ष नीuमा.आण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.       योगतज्ञ श्री.मोहन जगताप यांनी योगाचे व प्राणायामाचे महत्त्व प्रात्यक्षिके घेऊन पटवून दिले. हास्यकल्लोळच्या जया जोशी मॅडम यांनी हास्याचे आयुष्यातील फायदे सांगत हास्य योगाची प्रात्यक्षिके घेतली. तसेच बिट टु फिट च्या प्रियांका शेजाळ मॅडम यांनी झुंबा व अरेबिक्स यांच्या माध्यमातून शारीरिक कसरतीचे धडे शिकवले. संगीत दिनाच्या औचित्य साधून  संगीत विभागाचे प्रमुख विक्रम कदम यांनी विविध गाण्यांच्या थीम ऐकवून मुलींना गाणी म्हणण्यास प्रोत्साहित केले.         सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी योगासन हास्ययोग ,झुंबा व संगीताच्या प्रात...

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

इमेज
  सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड  येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५  या नविन शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस इयत्ता ५ वी ते ८ वी. या वर्गामधील  नविन प्रवेश  नवोगतांचे स्वागत कार्यक्रम प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, शाळेचे मुख्याध्यापक  शिरीष चिरमे सर,पर्यवेक्षक अनिल चौगुले. सर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थिनी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.   शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरूवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  सरस्वती पूजनाने  करण्यात आली. श्री.चिरमे सरांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व नवीन विद्यार्थिनींचे स्वागत व शाळे संदर्भात माहिती सांगितली.  दि. ५ जुन जागतिक पर्यावरण दिना निमित्त घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सर्व  नवीन विद्यार्थिनिंना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली.          शाळेच्या इ.१० वी व १२ वी उत्कृष्ठ  निकालाब...

सौ. आशालता उपाध्ये यांचा रोटरी तर्फे आदर्श माता पुरस्काराने सन्मान

इमेज
                  एक आदर्श माता कशी आसावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशालता उपाध्ये. त्यांनी त्यांच्या दिव्यांग मुलीला डॉक्टर व मुलांना इंजिनिअर करून त्यांना स्वबळावर उभे केले.  घराला घरपण आणि सामाजिक स्थान आणि परिवार समृद्ध बनविण्यात त्याची  मोलाची साथ आहे. या सर्व कार्याची दखल घेवून त्यांना रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व बियानी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सौ. गोदावरीदेवी बियाणी यांच्या स्मरणार्थ मागील 26 वर्षापासून आदर्श माता कृतज्ञता पुरस्कार आयोजित केला जातो. यावर्षी 2023 चा पुरस्कार  सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये यांना राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी याच्या हस्ते प्रदान करणेत आला.  त्याचे स्वरूप साडी, सन्मानचिन्ह, नारळ असे होते.           कार्यक्रमाचे संयोजक सुशील बियाणी यांनी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवराचे व पुरस्कार्थींचे स्वागत केले. विलास सुतार यांनी प्रास्ताविक केले. किशोर लंबे यांनी पुरस्कारप्राप्त मातांचा परीचय करून दिला. यावेली जी.एस. टी. चे केंद्रीय निरीक्षक रा...