अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड मार्फत सुदर्शन कला, संगीत शिबीरास सुरुवात
अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड मार्फत सुदर्शन कला व संगीत शिबीर दि. २२ एप्रिल ते दि. ३० एप्रिल २०२५ या कालावधी मध्ये आयोजित करणेत आले आहे. या शिबिराचा उदघाट्न समारंभ संपन्न झाला. इयत्ता ३ री ते १० वी या वयोगटातील विद्यार्थी - विद्यार्थिंनीसाठी परीक्षा कालावधीनंतर संगीत, कला, याचे शिक्षण मिळावे सुट्टीच्या वेळेचा सदूपयोग व्हावा म्हणून या उन्हाळी शिबीरामध्ये कॅनव्हास पेंटिंग, पाऊच पेंटिंग, पॉट पेंटिंग, वारली कला, कागदकामातील विविध कला शिवाय संगीतातील तबला, सुरपेटी, गिटार, करा-ओके गायन इ. सुप्त कलागुणांना वाव मिळावा या करिता या कला शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन 91.2 fm रेडिओ आर. जे. सौ.राजश्री महाजन यांचे हस्ते करणेत आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संचालिका कांचन उपाध्ये मॅडम यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. यावेळी सर्व विभा...